मुंबईतल्या वाळकेश्वरमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग
मुंबईतल्या वाळकेश्वरमध्ये बाणगंगा परिसरातल्या बहुमजली टॉवरला भीषण आग लागली आहे.
मुंबई : मुंबईतल्या वाळकेश्वरमध्ये बाणगंगा परिसरातल्या बहुमजली टॉवरला भीषण आग लागली आहे. रिगल टॉवरच्या १७ व्या मजल्याला ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. वाळकेश्वरमध्ये रिगल टॉवर ही ३२ मजली इमारत आहे.