COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई: आग लागली तर धुरापासून संरक्षण करण्यासाठी तोंडावर ओलं कापड बांधावं, असं तिला शाळेत शिकवलं होतं. शाळेत गिरवलेला हा धडा तिनं लक्षात ठेवला आणि वेळ येताच प्रत्यक्ष अंमलातही आणला. त्यामुळं एका कुटुंबाचे प्राण वाचले. घटना आहे मुंबईतील परेल इथल्या क्रिस्टल टॉवर्सला लागलेल्या आगीतील. शाळेत शिक्षकांनी शिकवलेला धडा झेन सदावर्तेनं पक्का ध्यानात ठेवला आणि आग लागताच कुटूंबियांना तो आमलात आणायला लावला. काय आहे नेमका थरार..? पाहा व्हिडिओ


 आगीत ४ जणांना मृत्यू


दरम्यान, परळमधील क्रिस्टल इमारतीला लागलेल्या आगीत ४ जणांना मृत्यू झाला आहे. या आगीमध्ये १६ जण जखमी झाले असून, काही जणांची प्रकृती गंभीर आहे. २० जणांची यामधून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं आहे.


क्रेनच्या माध्यमातून अनेक लोकांची सुटका


क्रेनच्या माध्यमातून अनेक लोकांची सुटका करण्यात आली. अग्नीशमन दलाच्या १० गाड्यांनी ही आग नियंत्रणात आणली. सकाळी ८ च्या दरम्यान ही आग लागली होती.