मुंबई : बॉम्बे हायजवळ रत्ना जहाजाला आग लागली. दरम्यान, आगीनंतर जहाज बुडाल्याची माहिती हाती आलेय. जहाजातील सर्व १६ क्रू मेंबर्सना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉम्बे हायजवळ तेल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ अरबी समुद्रात शिपिंग कॉर्पोरेशनची एक जहाज बुडाले. ही घटना संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली. तटरक्षक दलाने दुर्घटनाग्रस्त बोटीतील सर्व १६ कर्मचाऱ्यांना वाचवले आहे.


अरबी समुद्रात बुडालेली बोट ६४ मीटर लांबीची आणि २०३९ टन वजनाची होती. तिला जलसमाधी मिळाली.  याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. शिंपिग कॉर्पोरेशनने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच पीटीआयने हे वृत्त दिले आहे.