गिरगाव : गिरगाव चौपाटीवर पहिल्या सी प्लेन उड्डाणाची चाचणी घेण्यात आली. देशातील लहान आणि मोठी शहरं जोडण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं बोललं जातंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पाईस जेट कंपनी वर्षभरात सीप्लेन सेवा देशात सुरू करणार आहे. रस्ते, जल वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि विमान उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांच्या उपस्थितीत सीप्लेनची चाचणी घेण्यात आली. 


समुद्राबरोबरच नदी, तलाव, धरणातही सीप्लेन उतरू आणि उड्डाण करू शकते. पहिल्या टप्प्यात नागपूर आणि गुवाहाटी इथं जमिनीवर विमान उतरवण्याची चाचणी झाली.