बर्ड फ्लूमुळे मासे महागले..... पाहा माशांचा आजचा दर
बर्ड फ्लूचा मांसाहारी प्रेमींना फटका
मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : देशात कोरोना पाठोपाठ बर्ड फ्लूचा धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातही बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. बर्ड फ्लूमुळे मांसाहारी प्रेमींसमोर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. (Fish Price increased due to Bird Flu) यामुळे आता मांसाहारी प्रेमींना आपला मोर्चा माशांकडे वळवला आहे. बर्ड फ्लूचाा परिणाम मासे दरवाढीवर झाला आहे. बर्ड फ्लूच्या भीतीमुळे चिकन- मटण आणि अंड्यांची मागणी कमी झाली आहे. तर माश्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. बर्ड फ्लूमुळे माशांची मागणी वाढली आहे. मांसाहारी प्रेमींनी आता आपला मोर्चा माशांकडे वळवला आहे.
चिकन, मटण आणि अंड्यांवर ताव मारणाऱ्या मंडळींची सध्या थोडी पंचायत झाली आहे. कारण महाराष्ट्रात बर्ड फ्लूने शिरकाव केलाय. डॉक्टर भले चिकन, अंडी चांगली उकडून खा सांगत असतील मात्र चिकन आणि अंडी खाल्याने बर्ड फ्लू तर होणार नाही ना अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. म्हणूनच मग आता या मंडळींनी आपला मोर्चा माश्यांकडे वळवला आहे. तर माशांचे भावही चांगलेच वाढले आहेत.
माशांचे दर
पापलेट - 1500 किलो, 1000-1200
सुरमई - 500 ते 550 किलो, 400
हलवा - 500 किलो, 400
छोटी पापलेट - 900, 600-659
कोळणबी - 500-450, 300
रावस - 600, 400
बांगडा - 700 ला 25, 400 ला 25
बॉबील - 350-400 किलो, 200-250 किलो
तर चिकनचे भाव 220 किलोवरून 180 वर आले असून, मटणाचे भाव 680 वरून 640 झाले आहेत. अर्धा डझन अंड्याचे भावही 36 वरून 30 रुपये झाले आहेत. यामुळे आता मासे जरी खायचे म्हटले तरी थोडे अधिकचे पैसे मांसाहार करणाऱ्यांना मोजावे लागत आहेत. थंडीमुळे आवक कमी असल्यानं आधीच माशांच्या किमती वाढल्या आहेत यात आता बर्ड फ्लू आल्यानं दरांमध्ये अधिकच वाढ झाली आहे. यामुळे इथून पुढचे काही दिवस तरी मासे खवय्यांच्या खिशाला चाट बसणार आहे.