Maharashtra Politics, मुंबई :  शिंदे गटाचे आमदार तथा राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी वादग्रस्त वक्तव्यांचा धडाकाच लावला आहे. तुम्ही दारु घेता का? अतिवृष्टीची(heavy rain) पाहणी करताना अब्दुल सत्तार यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच प्रश्न विचारला होता. यानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांना सत्तार पप्पू(Pappu) म्हणाले होते. यानंतर आता अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केली.  त्यांची ही वादग्रस्त विधाने शिंदे-फडणवीस सरकारचे(Shinde-Fadnavis government) टेन्शन वाढवणारी अशीच आहेत. 


1. इतकी भिकारxx झाली असेल तर तिलाही देऊ; सत्तार यांची सुप्रिया सुळेंवर टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रिया सुळे यांनी 50 खोके यावरुन अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सत्तार यांची जीभ घसरली.  'इतकी भिकारxx झाली असेल तर तिलाही देऊ' असं वादग्रस्त वक्तव्य सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख केला.  


2. आदित्य ठाकरेंना अब्दुल सत्तार पप्पू म्हणाले 


काही दिवसांपूर्वी अकोला येथील सभेत अब्दुल सत्तार यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. जाहीर सभेतच अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना तीन वेळा पप्पू म्हणून उल्लेख करत टीका केली होती.


3. तुम्ही दारु घेता का? अतिवृष्टीची पाहणी करताना अब्दुल सत्तार यांचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न


अतिृष्टीने महाराष्ट्राला झोडपले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अब्दुल सत्तार यांनी बीड येथे अतिवृष्टीची पाहणी दौरा केला. यावेळी सत्तार यांनी थेट जिल्हाधिकारी यांना तुम्ही दारु घेता का? असा प्रश्न विचारला. अब्दुल सत्तार यांचा प्रश्न ऐकून जिल्हाधिकारी गोंधळले. काय उत्तर द्यावे हेच जिल्हाधिकाऱ्यांना कळेना. पाहणी दौऱ्यादरम्यान एका ठिकाणी चहा-पानासाठी थांबले असताना अब्दुल सत्तार यांनी जवळ बसलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारला होता. या व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.  


4. मला कुत्रा निशाणी मिळाली तरीही मी निवडून येतो


वादग्रस्त वक्तव्यामुळे अब्दुल सत्तार नेहमीच चर्चेत असतात. मला कुत्रा निशाणी मिळाली तरीही मी निवडून येतो. शिंदे आणि ठाकरे गटात पक्षाच्या निशाणीवरुन वाद सुरु असताना सत्तार यांनी हे वक्तव्य केले होते.


5. मुख्यमंत्र्यांच्या PA वर भडकले होते सत्तार; शिवीगाळ केल्याचाही आरोप


ऑक्टोबर महिन्यातच मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर एक बैठक पार पडली. या बैठकीत अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव यांच्यात जोरदार भांडण झाले. 100 दिवसांपासून मतदार संघाला निधी न मिळाल्याने, तसंच इतर कामं न झाल्याने सत्तार भडकले. त्यांनी यावेळी शिवीगाळ केल्याचा देखील आरोप केला जात आहे. मुख्यमंत्री आणि  सर्व आमदारांसमोरच हा प्रकार घडल्याने सचिव नाराज झाले होते.  


अब्दुल सत्तार यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून त्यांनी याबाबत सत्तार यांना समज दिल्याची देखील चर्चा आहे. मात्र, सत्तार यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सातत्याने सुरुच आहे.