मुंबई : मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा विमान सेवेला देखील फटका बसला आहे. पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने ७ विमानं रद्द करण्यात आली आहेत. तर ९ विमान जवळच्या विमानतळाच्या नेऊन तेथून उड्डाण केलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत पावसाने २ तासापासून विश्रांती घेतल्याने, सखल भागात साचलेलं पाणी कमी होण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईत ठिकठिकाणी पाण्याचं पाणी साचू नये, म्हणून महापालिकेचे कर्मचारी काम करत आहेत.


तर दुसरीकडे मुंबईत पहाटे झालेल्या धुँवाधार पावसानंतर सकाळी सातपासून पाऊस रिमझिम बरसत असल्याने, मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.


काही रेल्वेगाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही रेल्वे गाड्यांचा मार्गही बदलण्यात आला आहे. कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते बदलापूर या मध्य रेल्वेच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, यामुळे मध्य रेल्वेची लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.