मुंबई : दिवाळीच्या तोंडावर मिठाई आणि मिठाईसारखे काही पदार्थ बनवण्यासाठी बनावट खव्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. पण संबंध महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात  अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून झाडाझडती होण्याची अपेक्षा आहे. कारण भेसळ झालेला खवा मोठ्या प्रमाणात परराज्यातून येतो, अशी चर्चा असताना देखील संबंधित विभाग याची का दखल घेताना दिसत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राचा अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभाग कारवाई करण्यात दिरंगाई का करत आहे. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दिवाळीच्या तोंडावर दरवर्षी परराज्यातून मोठ्या प्रमाणात हा खवा येतो, तो नागरिकांच्या आरोग्याला धोकायदायक आहे. तरी देखील अन्न आणि औषध प्रशासन विभाग गप्प का बसला आहे, असे प्रश्न सोशल मी़डियावर उपस्थित केले जात आहेत.


दिवाळीच्या तोंडावर खाद्यान्नात भेसळ करणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. उत्तर प्रदेश प्रशासनाने आता अशा बनावट माव्यावर आणि पनीरवर छापेबाजी सुरू केली आहे. ग्रेटर नॉयडा परिसरात मोठ्या प्रमाणात मावा जप्त करण्यात आला. हा मावा आणि पनीर देशभरात भेसळीसाठी नेण्यात येणार होता.