मुंबई :  मुंबईतील मालाड येथे एका माजी हॉकीपट्टूची हत्या झाल्याची खळबळजनक घटना उडकीस आली. ही हत्या त्याच्या पत्नीने दारूच्या नशेत केल्याची बातमी समोर येत आहे. 
पत्नीला ठार करुन त्यावरच ती थांबली नाही तर तिने स्वत: लाही जखमी करुन घेतले. तिच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हत्येचे नेमके कारण अद्याप समजले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.


अमिता (४५) असे या महिलेचे नाव तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपैया चेनंदा (५२) असे तिच्या मृत पतीचे नाव आहे.
अपैया माजी हॉकीपटू होता. एअर इंडिया, टाटा व मुंबई टीमतर्फे तो हॉकी खेळायचा. एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंबधीचे वृत्त दिले आहे.


अमिता अपैयाची दुसरी पत्नी असून त्यांच्यात सतत वाद होत असत. दरम्यान अपैयाच्या हत्येचे वृत्त कळताच त्याच्या मित्रपरिवाराला धक्का बसला आहे. 
पत्नी अमिता व दोन मुलांसमवेत तो मालाड येथील काचपाडा भागात राहायचा. 


शनिवारी दुपारी त्यांची मुलं घरी नव्हती. दरम्यान अपैया व अमिता यांनी एकत्र मद्यपान केले होते.


दारूच्या नशेत यांच्यामध्ये शुल्लक कारणावरुन झालेला वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात अमितानेअपैयावर सपासप वार केले. 


अपैयाने मदतीसाठी गयावया केली. पण दारुच्या नशेत असलेली अमिता अपैयावर वार करतच होती.यामध्ये अपैयाचा अंत झाला.