CBI Investigation | अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत सीबीआय पोहोचलं...
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने समन्स दिले आहे. अनिल देशमुख यांना सीबीआयसमोर
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने समन्स दिले आहे. अनिल देशमुख यांना सीबीआयसमोर १४ एप्रिलला हजर राहाण्याचे आदेश सीबीआयने दिले आहेत. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी रूपये हफ्ताने वसूल करण्याचा निरोप दिला होता, असा आरोप अनिल देशमुख यांच्यावर केला होता. सचिन वाझे याच्याकडून १०० कोटी रुपये मुंबईतील बार चालकांकडून वसूल करण्याचा निरोप अनिल देशमुख यांचा होता असा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता.
पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे परमबिरसिंग यांनी गाऱ्हाणे मांडले होते, पण मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही चौकशी झाली नाही, तेव्हा यानंतर यासाठी परमबीर सिंग हे मुंबई हायकोर्टात गेले होते, मुंबई हायकोर्टाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते, यानंतर या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी होत आहे.
मुंबई हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर, अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तोपर्यंत अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नव्हता. सीबीआय चौकशीचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण हा निकाल कायम ठेवण्यात आला.