न्यायाधीशांच्या पत्रकार परिषदेवर माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांची प्रतिक्रिया
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत खळबळ उडवून दिलीय.
मुंबई : भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत खळबळ उडवून दिलीय.
न्यायमूर्ती एम जे चेल्लमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय कार्यपद्धतीवर तीव्र नापसंती व्य़क्त केलीय.
लोकशाहीत न्यायालयांची स्वायत्तता राखणं गरजेचं आहे. मात्र त्यापद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज सुरू नसल्याचा आक्षेत या चारही न्यायाधीशांनी नोंदवला. एवढमंच नव्हे तर मुख्य न्यायाधीशांना भेटून त्यांच्यासमोर अनेक प्रश्न मांडले मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळेच जनतेसमोर येवून भूमिका मांडण्याशिवाय पर्याय नव्हता असंही चेल्लमेश्वर यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे.
‘न्यायाधीशांना प्रसारमाध्यमांसमोर यावं लागलं, ही अभूतपूर्व पायरी चढावी लागली. याचा अर्थ नक्कीच काहीतरी गंभीर मुद्दा आहे. किंवा त्यांच्यात काहीतरी अंतर्गत वाद असतील’, अशी प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश पी.बी.सावंत यांनी दिली आहे.