मुंबई : घाटकोपर येथील दामोदर पार्क येथे चार मजल्याची इमारत कोसळली आहे. घाटकोपरमधील साई अपार्टमेंटमधील ही इमारत कोसळली आहे. ही रहिवाशी इमारत होती आणि रहिवासी या इमारतीत राहत होते. त्यामुळे काही जण या इमारतीखाली दाबले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. ४० वर्ष जुनी ही इमारत असल्याची माहिती आहे. पडलेल्या इमारतीच्या तळ मजल्यावर नर्सिंग होम आहे. यामध्ये गरोदर महिला आणि लहान जन्मलेली बाळ असण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Live Update


11.50 AM दोन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर ढिगाऱ्याखाली ६० ते ७० जण दबले गेल्याची भीती व्यक्त होत आहे.


11:58 AM इमारतीच्या ढिगाऱ्याखालून ९ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश


  11:59 AM अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी, बचावकार्य सुरु

  12.02 PM  १४ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरु

 12.13 PM घाटकोपर येथील इमारत कोसळल्याप्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. सरकार या प्रकरणी निवेदन करणार

 12.18 PM एका महिलेचा या घटनेत मृत्यू

 12.30 PM अग्निशमन दलाचा एक जवान जखमी

 01:00 PM घाटकोपर - इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून आतापर्यंतं १२ जणांचा मृत्यू

 01.30 PM ३ महिन्याच्या मुलीचा मृतदेह सापडला, आई अजून बेपत्ता, वडिलांना सुखरुप काढलं बाहेर

 01.40 PM इमारती कोसळल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १३ वर