मुंबई : मुंबईतील वरळी परिसरातील बीडीडी चाळीमधील एका इमारतीत गॅसचा स्फोट झाला आहे. मंगळवारी 5.30 च्या सुमारास गॅसचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 4 जण जखमी झाले आहेत. यामध्ये पाच महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि वॉर्डमधील अधिकारी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. जखमी चारही जणांना नायर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 



यामध्ये आनंद पुरी आणि 4 महिन्यांचं बाळ गंभीर जखमी आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.