मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर साडे चारच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेता सुशांत सिंह राजपूत पंचत्वात विलीन झाला आहे. त्यांच्या अंत्यसंस्कार अनेक टीव्ही कलाकार उपस्थित होते. तसेच अभिनेत्री श्रद्धा कपूर, कृति सेनन आणि अभिनेता विवेक ऑबेरॉय देखील उपस्थित असल्याचं कळतं आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील श्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंत्यसंस्काराला सुशांत सिंह राजपूतचे वडील, चुलत भाऊ, तीन बहिणी आणि इतर जवळचे मित्र उपस्थित होते. सोबतच त्याची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती, रणदीप हूडा, राजकुमार राव, सुनील शेट्टी, वरुण शर्मा आणि अर्जुन बिजलानी यांच्यासह अनेक टीव्ही कलाकार उपस्थित होते. 


रविवारी सुशांतने त्याच्या वांद्रे येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या बातमीनंतर सर्वांनाचा मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या जाण्याने वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अनेक बॉलिवूड कलाकार या घटनेनंतर स्तब्ध आहेत.