मुंबई : मुंबईतील दिंडोशी परिसरातील नाल्यातून पोलिसांनी दहा तोळे सोनं ताब्यात घेतलं. सोन्यानं भरलेली पिशवी शोधण्यात उंदरानं पोलिसांना मार्ग दाखवला, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. एका महिलेने भिकारी स्त्रीला पाव दिला होता. परंतु पाव कोरडा असल्याने भिकारी स्त्रीने तो कचरकुंडीत फेकला होता. याच पिशवीत सोन्याचे दागिने होते, ज्याची किंमत सुमारे पाच लाख रुपये आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजच्या मदतीने पोलिसांना दागिन्यांची पिशवी कुठे आहे याचा शोध घेता आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिंडोशी म्हणून राहणारी सुंदरी नावाची महिला आपल्या मुलीचे लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी घरात ठेवलेले 10 तोळे सोन्याचे दागिने घेऊन बँकेत निघाली. वाटेत सुंदरीला एक गरीब महिला आणि तिचे मूल दिसले. सुंदरीने पिशवीत ठेवलेला काही पाव मुलाला दिला आणि निघून गेली. याच पिशवीत सोन्याचे दागिनेही होते. 


सुंदरी बँकेत पोहोचली तेव्हा तिला समजले की, तिने मुलाला दिलेली वडापावची पिशवी त्यात सोन्याचे दागिनेही ठेवले होते. सुंदरी लगेच बँकेतून निघाली आणि त्या ठिकाणी पोहचली. परंतू तिला ती महिला सापडली नाही. त्यानंतर तिने तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली.


दिंडोशी पोलिसांच्या तपास पथकांने तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता ती गरीब महिला निघून जाताना दिसली. पोलिसांनी महिलेशी संपर्क साधला असता तिने वडापाव कोरडा असल्याने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पिशवीसह तो सोबत फेकून दिल्याचे सांगितले.


पोलिसांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पिशवी शोधण्यास सुरुवात केली मात्र ती तेथे सापडली नाही. पोलिसांनी कचराकुंड्याजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, पोलीस ज्या कचऱ्याची पिशवी शोधत होते ती उंदराच्या ताब्यात असल्याचे दिसून आले. 


प्रत्यक्षात एक उंदीर त्या पिशवीत घुसला आणि त्यात ठेवलेला वडापाव खात इकडे तिकडे फिरत होता. असा संपूर्ण प्रकार पोलिसांनी सिसिटीव्हीच्या मदतीने पाहून संबंधित महिलेला सोनं परत केलं.