Raj thackeray Celebrating Ganeshotsav : सर्वत्र गणपती बाप्पा मोरया असा जयघोष होत असतानाच नेतेमंडळींही या उत्सवात एकरुप झाल्याचं पाहायला मिळत आहे. नितीन गडकरींपासून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि (MNS) मनसे अध्यक्ष राज ठाकरेसुद्धा गणरायाचरणी नतमस्तक झाले आहेत. (Ganeshotsav 2022)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांनी त्यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या राहत्या घरी बाप्पाचं स्वागत केलं. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनीही गणपतीची आराधना केल्याचं पाहायला मिळालं. 


ठाकरे कुटुंबासाठी यंदाचा गणेशोत्सव अतिशय खास असण्याचं कारण म्हणजे, अमित ठाकरे यांच्या मुलाचा म्हणजेच किआन ठाकरे या चिमुकल्याचा हा पहिलाच गणेशोत्सव. नातवाला या सणाची ओळख करुन देताना राज ठाकरे यांच्यातले आजोबा जागे झाले आणि त्यांनी लगेचच हे सर्व क्षण तातडीनं त्यांच्या मोबाईल कॅमेरात टीपण्यास सुरुवात केली. (Raj thackeray grandson)





मंगलपर्वाच्या या दिवसांमध्ये सर्वत्र आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. ठाकरे कुटुंबीयांच्या शिवतीर्थ (Shivaji park shivtirth) या निवासस्थानीसुद्धा सध्या असंच वातावरण पाहायला मिळत आहे. 


शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी पहिल्यांदाच गणेशाची स्थापना झाली. अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नीनं गणेशाची पूजा केली. हे क्षण अनुभवताना संपूर्ण ठाकरे कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता.