शिवसेनेची स्वबळावर सत्ता येवू दे, मनोहर जोशींचं बाप्पांकडे मागणं
मनोहर जोशींच्या घरी बाप्पाचं आगमन
मुंबई : राज्यात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येवू दे, एवढंच मागणं गणरायाकडं केल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी सांगितलं आहे. इतर काही राज्यांमध्ये ज्याप्रमाणे प्रादेशिक पक्षांना स्वबळावर सत्ता मिळाली तसंच स्वबळाचे यश शिवसेनेलाही मिळू दे असं बाप्पाकडं मागितल्याचे त्यांनी म्हटलं आहे. पिढ्यानपिढ्या मनोहर जोशी यांच्या घरी गणराया विराजमान होत आला आहे. येणारं वर्ष निवडणुकीचे असल्यानं त्यांच्यासाठी यंदाचा हा गणेशोत्सव खास आहे.
मनोहर जोशी यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी