गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात बाप्पाचं आगमन होत असेल आणि नियमांचे पालन करण्यात येत नसेल तर, आता नियमांचे पालन न करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने मदतीचे हात पुढे करण्यात आला. परंतु आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून रस्त्यावर मंडप उभारण्यासाठी किंवा रोषणाई करण्यासाठी खड्डे खोदण्यात आल्यास महानगरपालिकेकडून कारवाई करण्यास सुरवात करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोरिवलीमधील आर. मध्य या एका विभागातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी १६६ अर्ज करण्यात आले होते. त्यापैकी ५४ अर्ज रद्द करण्यात आले आहे. रस्तावर खड्डे केल्यामुळे आतापर्यत ६ मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ लाख ५४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे मंडळाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 


रस्तावर एक खड्डा पडला तर २ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.


कारवाई केलेली मंडळे 


नवं युवक मित्र मंडळ ८० हजार रुपये 


जय जवान नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ७२ हजार रुपये 


राजेंद्र नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ३२ हजार रुपये 


ओमकर सेवा मित्र मंडळ १० हजार रुपये