मुंबई : मुलुंडच्या अगरवाल रुग्णालयासमोरील रस्त्यावर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फूटपाथ बनविण्याचे काम सुरू असताना महानगर गॅसची पाईपलाईन फुटली. या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली. दरम्यानस अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ही गळती रोखली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मुलुंडमधील आठवडाभरातील दुसरी घटना आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फूटपाथचे काम सुरु आहे. त्यासाठी क्रेनच्या सहाय्याने रस्ता खोदण्याचे काम सुरू होते. त्यावेळी क्रेन चालकाने रस्ता शोधताना भूमिगत महानगर गॅसची पाईपलाईनला ट्रेनचा धक्का लागला आणि पाईपलाईन फुटली. यावेळी मोठ्या प्रमाणात गॅसची गळती होऊ लागली. तब्बल पाऊण तास या पाईपलाईनमधून गॅस गळती होत होती आणि त्याच्या आवाजामुळे आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली होती. 



दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून या पाईपलाईनमधून जाणाऱ्या गॅसचा पुरवठा बंद केला. या घटनेत कोठलीही जीवीत हानी झालेली नाही. महानगर गॅसची पाईपलाईन फुटून गळती झाल्याचीही मुलुंडमधीलच आठवडाभरातील दुसरी घटना आहे. त्यामुळे फूटपाथचे काम करताना योग्य ती काळजी घेतली नसल्याने ही घटना घडल्याची संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.