`घाटकोपर मेट्रो आणि रेल्वे स्थानकातील गर्दी कमी होणार ?`
मेट्रो सुरू झाल्यापासून मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्थानकात प्रवाश्यांची प्रचंड गर्दी होत आहे.
मुंबई : पूर्व उपनगराला पश्चिम उपनगराशी जोडणारी मेट्रो सुरू झाल्यापासून मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्थानकात प्रवाश्यांची प्रचंड गर्दी होत आहे. यावर उपाय काढण्याची मागणी खासदार मनोज कोटक यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली होती. यावर आज रेल्वेचे अधिकारी, मेट्रोचे अधिकारी आणि खासदार मनोज कोटक यांनी घाटकोपर मेट्रो स्थानक, रेल्वे स्थानक, रेल्वेचे पूल यांची पाहणी केली.
मेट्रो आणि रेल्वे स्थानकात गर्दी कमी करण्यासाठी कोण कोणत्या उपाय योजना शक्य आहेत ? यावर चर्चा करण्यात आली.
यात त्वरित आणि दीर्घकाळ उपाय योजना बाबत अमंलबजावणी करण्यात येणार आहे. या बाबतचा आराखडा तीस दिवसात सादर करावा लागणार आहे. यामुळे घाटकोपर मेट्रो आणि रेल्वे स्थानकातील गर्दी कमी होण्यास मोठी मदत होईल असे मनोज कोटक म्हणाले.