घाटकोपर : घाटकोपरच्या खोत लेन मध्ये फेरीवाल्यानी उच्छाद मांडला आहे. त्याचमुळे आज खोत लेन येथील इमारतीच्या बाहेर गाडी काढत असताना, दुचाकी स्वाराबरोबर स्थानिकांचे भांडण झाले आणि त्या दुचाकी स्वाराने गाडीवर दगड मारत गाडी वाल्याला मारहाण केली त्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक खोत लेन मधील फेरीवाल्याविरुद्ध आक्रमक झालेत. दरम्यान पोलिसांनी दुचाकी स्वराला अटक केली आहे. खोत लेनमध्ये फटाक्यांची विक्री खुलेआम होत असून त्याबद्धल तक्रार करून सुद्धा कारवाई होत नव्हती मात्र आज पोलिसांनी सर्वानाच हटवले आहे.


दुसरीकडे ठाण्यात मनसेच्या आंदोलनाचा फुसका बार ठरला असून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत, आता त्यांच्यावर अटकेची तलवार आहे. त्यामुळे एकूणच फेरीवाले प्रश्नावर महापालिका, मनसे आणि सत्ताधारी सेना-भाजप काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिलंय, मात्र मुंबईतल्या घाटकोपरमध्ये या फेरीवाल्यांवर महापालिका कधी कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.