बहुतांश मागण्या मान्य होतील - गिरीश महाजन
वेगवेगळ्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी लाँग मार्च मोर्चा काढला.
मुंबई : वेगवेगळ्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी लाँग मार्च मोर्चा काढला.
शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च शनिवारी मुंबईच्या बाहेर पोहोचला. हजारो शेतकऱ्यांचा सहभाग असलेले हे लाल वादळ शनिवारी रात्री ठाणे शहरात दाखल झाले. मोर्चेकऱ्यांच्या मोठ्या संख्येमुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. शेतकरी सोमवारी विधान भवनाला घेराव घालणार आहे.
काय म्हणाले गिरीश महाजन?
उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा होणार असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं. महाजनांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी स्वतः निमंत्रण दिले आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा सोमय्या ग्राऊंडवर पोहचण्याआधी गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांची मुलुंड येथे घेतली भेट. बऱ्याच मागण्या मान्य होणार असल्याचं देखील गिरीश महाजन यांनी सांगितलं.