दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील भाजप सरकारचे संकटमोचन गिरीश महाजन यांनी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलं आहे की, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मिळून जास्तच जास्त ४० किंवा ५० आमदार निवडून येतील. तसेच राष्ट्रवादीचे देखील मोठ्या प्रमाणात आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार, पदाधिकारी पक्षात राहायला तयार नाहीत, उत्सुक नाहीत. या आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा त्यांच्या नेत्यांवरच विश्वास राहिलेला नसल्याचं गिरीश महाजन यांनी आज सांगितलं.


सध्याच्या स्थितीला ५० च्या जवळपास आमदारांना राष्ट्रवादीत राहायचं नाहीय, त्यांना आता भाजपचे डोहाळे लागले आहेत. आपआपल्या भागातील अनेक बडे नेते, आमच्या संपर्कात येत आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी जेमतेम ४० ते ५० आमदार निवडून येतील, असं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.