मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी हजारों शेतकरी सरकारी दरबारी दाखल झाले असून आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते इथून हलणार नाहीयेत. त्यांच्याशी सरकार दुपारी १ वाजता चर्चा करणार आहे. 


कधी होणार बैठक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गिरीश महाजन म्हणाले की, शेतक-यांच्या मागण्यांसंदर्भात मंत्रीगटाच्या बैठकीत चर्चा झाली. दुपारी १ वाजता १२ जणांचं शिष्टममंडळ बैठकीला येणार आहे. बैठकीला संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित राहावं म्हणून मंत्रीगटाची स्थापना केली आहे.


‘लेखी स्वरूपात मागण्या मान्य करू’


गिरीश महाजन यांनी सांगितले की, ‘शेतक-यांच्या मागण्यांना लेखी स्वरूपात मान्य करणार आहोत. बैठकीनंतरही घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी वेगाने व्हावी यासाठी मंत्रीगट काम करेल, असेही ते म्हणाले.