मुंबई : आपल्या गर्लफ्रेंडला मारहाण केल्यानंतर पळून गेलेल्या अभिनेता अरमान कोहलीला लोणावळ्यातून पोलिसांनी अटक केली. त्याने जामीनासाठी अर्ज केला. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावलाय. त्यामुळे अरमानला २६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरमान कोहली याने गर्लफ्रेंड नीरु रंधवा हिला मारहाण केली. सांताक्रूज पोलिसांनी मंगळवारी  त्याला लोणावळ्यातून अटक केली होती. त्यानंतर अरमान कोहली याने आपल्या सुटकेसाठी बांद्रा न्यायालयात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने अरमान याचा जामीन अर्ज फेटाळला. 



३ जून रोजी अरमानने आपल्याला मारहाण केल्याची तक्रार नीरु रंधवा हिने सांताक्रूज पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यानंतर अरमानच्या घरी पोलीस गेले होते. त्यावेळी तो मुंबईतील त्याच्या घरी सापडला नव्हता. तो फरार झाला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी लोणावळ्यातून ताब्यात घेतले.