Gold Silver Rate | सोन्याच्या दरात इतक्या हजार रुपयांनी घट, खरेदीदारांची `चांदी`
सोने-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.
मुंबई : सोने-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Rate) घसरण झाली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करण्यासाठी हीच सूवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही महिन्यांवर लग्नाचा मुहूर्त येऊन ठेपला आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. (gold fell by ruppes 3 hundred per 10 grams and silver rate by rs 2 thousand per kg)
किती रुपयांनी घट?
चांदीच्या दरात 2 हजारांनी घट झाली आहे. तर 10 ग्राम सोन्याच्या दरांमध्ये 300 रुपयांची घसरण झालीये. यामुळे चांदीचा दर 66 हजारांवरुन 64 हजार इतका झालाय. आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडींच्या पार्श्ववभूमीवर ही घसरण झाल्याचं म्हंटलं जात आहे.