सिद्धीविनायक मंदिरातील अडीच किलो सोन्याच्या वस्तूंचा लिलाव

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या सुमारे अडीच किलो सोन्याच्या वस्तूंचा लिलाव करण्यात आला.
मुंबई : मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या सुमारे अडीच किलो सोन्याच्या वस्तूंचा लिलाव करण्यात आला.
यावेळी मुंबईच नाही तर परदेशातून आलेले गणेशभक्तही उपस्थित होते. भक्तांनी या सोन्याच्या वस्तू बोली लावत बाप्पाचा प्रसाद म्हणून घेतल्या.
या वस्तूच्या लिलावातून मिळणारी रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरली जाणार आहे.