मुंबई : जागतिक बाजारात आलेले मंदी आणि सोने खरेदीसाठी सराफा व्यापाऱ्यांकडून आलेला कमी प्रतिसाद पाहता सोने दरात घट झालेली पाहायला मिळाली. तसेच डॉलरच्य तुलनेत रुपया थोडा मजबुत झाल्याने सोने खरेदीत वाढ झालेय. त्याचवेळी सोने दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. देशातील प्रमुख शहरांत सोने दरात घट होताना दिसत आहे. चेन्नईत सोने दर थेट ३००० रुपयांनी खाली आले आहे. 


 मुंबई - पुणे सराफा बाजारात घट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत सोने खरेदीला विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. दरम्यान, सोने दरात मोठी घसरण झाल्याने सोने खरेदीत तेजी दिसून येत आहे. अन्य शहरांची विचार करता मुंबईत सोने दरात घसरण पाहायला मिळत आहे. मुंबईत २२ कॅरेटला २९३५० तर २४ कॅरेटला ३१,९०० रुपये प्रति १० ग्रॅम दर मिळत आहे. सोने दरात ही मोठी घट दिसून येत आहे. याआधी सोने दरात वाढ झाली होती. काल सोने दरात जास्तच घसरण पाहायला मिळाली. आज यात सुधारणा होऊन १२० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आणि पुण्यात सोने खरेदीला लोक प्रधान्य देताना दिसत आहेत. दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपया थोडा मजबुत झाल्याने सोने खरेदीला वेग आलाय. पुण्यात सोने २२ कॅरेटला २९४२० रुपये तर २४ कॅरेटला ३२,४५० रुपये प्रति तोळा दर मिळत आहे.


उत्तर भारतात सोने ३० हजारांखाली


उत्तर भारतात दिल्लीत सोने खरेदीत तेजी दिसून येत आहे. दिल्ली हे राजधानीचे शहर आहे. त्यामुळे संपूर्ण देशातून अनेक लोक दाखल होतात. तसेच येथे फॅशनेबल दागिने बनविण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे येथे सोने खरेदीत तेजी दिसते. मागणी जास्त असूनही दिल्लीत सोने दर ३० हजाराच्या खाली गेलेला दिसून येत आहे. ही सोने दरात मोठी घसरण आहे. दिल्लीत सोने दर हा ३२ हजार रुपयांच्या घरात पोहोचला होता. आता थेट ३ हजार रुपयांनी सोने दरात घसरण पाहायला मिळाली. दिल्लीत  २२ कॅरेटला २९,१५० रुपये तर २४ कॅरेटला ३१,८५० रुपये प्रति तोळा दर आहे.


दक्षिण भारतात मोठी घसरण


दक्षिण भारतात सोने दरात मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे. तामिळनाडूमध्ये सर्वाधिक सोने खरेदी केली जाते. दक्षिण भारतात सोने दागिने बनविण्याची मोठी क्रेज आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. चेन्नईत सोने दर सर्वात कमी आहे. चेन्नई, २२ कॅरेटला २८,५४० तर २४ कॅरेट सोने दर ३१,२५० रुपये प्रति तोळा आहे.


प्रमुख शहरांतील सोने दर (१० ग्रॅम)


मुंबई -  २२ कॅरेट - २९३५०,
२४ कॅरेट - ३१,९००


पुणे - २२ कॅरेट - २९४२०, 
२४ कॅरेट - ३२,४५०


दिल्ली -  २२ कॅरेट - २९,१५०,
 २४ कॅरेट - ३१,८५०


चेन्नई - २२ कॅरेट - २८,५४०, 
२४ कॅरेट - ३१,२५०


अहमदाबाद -२२ कॅरेट - २९,३६०, 
२४ कॅरेट - ३२,२५०