मुंबई : आज जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली असून, त्याचा परिणाम भारतीय वायदे बाजारावरही दिसून आला. यूएस फेड रिझर्व्हने व्याजदर वाढवण्यापूर्वी सराफा बाजारावरही दबाव आहे. भारतीय वायदे बाजारात सोने आणि चांदी घसरली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक बाजारातून मिळणाऱ्या संमिश्र संकेतांमुळे आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार नोंदवली गेली. काल म्हणजेच 26 जुलै रोजी सोन्याच्या दरात थोडीशी वाढ झाली असली तरी आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली. सोने सध्या 51,000 च्या खाली ट्रेड होत आहे.


जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमतींवर दबाव राहिल्याचा परिणाम भारतीय वायदे बाजारावरही दिसून येत आहे.


जाणून घ्या आज सोन्या-चांदीचे दर काय आहेत?


मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव  सकाळी 10 रुपयांनी वाढून 50,574 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर MCX वर चांदी 155 रुपयांनी घसरून 54,560 रुपये झाला. यापूर्वी सोन्याचा व्यवहार 50568 रुपयांवर सुरू झाला होता, तर चांदीचा व्यवहार 54605 रुपयांवर सुरू होता.


मुंबईतील सराफा बाजारात आज सोन्याचे दर 50,680 रुपये प्रति तोळे इतके होते. चांदीचे दर 54600 रुपये प्रति किलो इतके होते.


तुम्ही देखील तपासू शकता दर


तुम्हालाही सोन्या-चांदीची किंमत जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि त्यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल. त्यावरून तुम्ही नवीन दर तपासू शकता.