मुंबई : कस्टम विभागाच्या एयर इंटेलिजेंस यूनिटने एक कोटी 67 लाखांचं सोनं जप्त केलं आहे. एक गुप्त सूचना मिळाल्यानंतर कस्टम विभागाने दोन प्रवाशांना ताब्यात घेतलं. त्यांचा चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून 6 सोन्याची बिस्कीट मिळाली. एकूण 6109 ग्रॅम सोनं कस्टम विभागाने जप्त केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरीश कुमार चोपडा आणि करण कुमार हे दोन प्रवासी बँकॉक येथून मुंबईला एअर इंडियाच्या AI 331 विमानाने पोहोचले. अजय कुमार या व्यक्तीला हे सोनं दिलं जाणार होतं. जो दिल्लीहून मुंबईला एअर इंडियाच्या AI 191 विमानाने आला होता. या प्रवाशांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून हे सोनं जप्त केलं. 


सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. सोन्याची तस्करी कधी पासून सुरु आहे याबाबत पोलीस कसून चौकशी करत आहे.