मुंबई : मुंबईकरांसाठी एक गूड न्यूज आहे. मुंबईत एमएमआरडीए मार्फत लवकरच रोप वे प्रकल्प उभारला जाणारंय. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झालीय. गोराई-मार्वेमार्गे हा प्रस्तावित रोपवे प्रकल्प आगामी मेट्रो लाईन 2A सोबत जोडला जाईल. (good news for Mumbaikars A ropeway project will be set up in Mumbai soon through MMRDA)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


568 कोटींचा हा प्रस्तावित प्रकल्प असून जानेवारी 2023 पासून प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होणारंय. मुंबईत दिवसेंदिवस ट्रॅफिकची समस्या वाढतेय. मात्र या रोपवेमुळे महावीर नगर ते गोराई प्रवासाचा वेळ 36 मिनिटांपर्यंत कमी होणारंय. सध्या महावीर नगर ते गोराई या प्रवासासाठी दीड तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.