मुंबई : Mumbai local News : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. (Mumbai local train Update) लोकलने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेची पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर एसी लोकलच्या तब्बल 80 फेऱ्या वाढणार आहेत. (Good news for Mumbaikars, possibility of increasing AC local trains on Central Railway)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध केली जात आहे. तसेच लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे. 


या मार्गिकेचे काम जानेवारी 2022 पर्यंत पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे...हे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व एसी लोकल मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर चालवण्यात येणार आहे.



ठाणे ते दिवा पाचवा, सहाव्या मार्गाला गती दिली जात असून त्यासाठी जानेवारी ते फेब्रुवारी 2022 पर्यंत 24 ते 72 तासांचे ब्लॉक घेण्यात येणार आहेत.


दरम्यान, मध्य रेल्वेच्या लोकलच्या फेऱ्यातही वाढ होणार असून गर्दीवर नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे. (Mumbai Local Train) मध्य रेल्वेवर 100 उपनगरी लोकल सेवा वाढण्याची शक्यता आहे. ठाणे ते दिवा दरम्यान गेल्या 10 वर्षांपासून रखडलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाचं काम जानेवारीत पूर्ण झाल्यावर लोकल फेऱ्या वाढणार आहेत.