मुंबई : आता मुंबई पुण्यातल्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी. भारतातील पहिली इंटरसिटी इलेक्ट्रीक बस आता सेवा मुंबई पुणे मार्गावर धावणार आहे. आज मुंबईतल्या अंधेरीमध्ये या इलेक्ट्रीक बसचं लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते पार पडलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या इलेक्ट्रीक बस २ तास चार्ज केल्यानंतर तब्बल ३०० किलोमीटरपर्यंत धावू शकतात. या इलेक्ट्रीक बसच्या सुरुवातीला मुंबई पुण्यादरम्यान दिवसातून २ फेऱ्या होणार आहेत.


इतर बससेवेप्रमाणं या बसचं भाडं हे ४५० ते ५०० रूपये इतकं असेल. वातानुकुलित या इलेक्ट्रीक बसमधून 43 प्रवासी प्रवास करु शकतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या इलेक्ट्रीक बसमुळं प्रदूषण होणार नाही.