मुंबई : राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनात कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. राजभवनातील १०० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली, यातल्या १६ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राजभवनातील इलेक्ट्रिशियनला कोरोनाची लागण झाल्यानंतर राजभवनातल्या १०० कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. हे सगळे कर्मचारी राजभवन परिसरातील क्वार्टर्समध्ये राहतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती दिली आहे. आपल्या प्रकृतीसंदर्भात प्रसार माध्यमांत काही ठिकाणी प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार असल्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे.


'आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. करोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. मात्र, इतरत्र असलेली परिस्थिति पाहून आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मास्कचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहोत,' असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले आहेत.