Govt Job: दूरसंचार विभागात अकाऊंटंट, स्टेनोची भरती, मुंबईत मिळेल लाखभर पगाराची नोकरी
DOT Recruitment 2024: या भरतीअंतर्ग एकूण 27 पदे भरली जाणार आहेत.
DOT Recruitment 2024: पदवीधर असून चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या दळणवळण मंत्रालयात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. संचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागात ज्युनिअर अकाऊंटंट, लोअर डिव्हिजन क्लर्क, पीएस, स्टेनो आणि एमटीएस या पदांसाठी रिक्त जागा जाहीर भरल्या जाणार आहेत. या भरतीअंतर्ग एकूण 27 पदे भरली जाणार आहेत.
रिक्त पदांचा तपशील
ज्युनिअर अकाऊंटंटची 9 पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेवल 5 नुसार 29 हजार 200 पर्यंत पगार दिला जाणार आहे. लोअर डिव्हीजन लिपिकची एकूण 15 पदे भरली जाणार आहेत.या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेवल 2 नुसार 19 हजार 900 पर्यंत पगार दिला जाणार आहे. पीएसचे 1 पद भरले जाणार आहे.या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेवल 7 नुसार 44 हजार 900 ते 1 लाख 42 हजार 400 पर्यंत पगार दिला जाणार आहे. स्टेनोचे 1 पद भरले जाणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेवल 4 नुसार 25 हजार 500 ते 81 हजार 100 पर्यंत पगार दिला जाणार आहे. एमटीएसचे 1 पद भरले जाणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेवल 1 नुसार 18 हजार ते 56 900 पगार दिला जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अर्जाची शेवटची तारीख
यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 21 ऑक्टोबरपर्यंत अधिकृत वेबसाइट dot.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
कुठे पाठवाल अर्ज?
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज योग्यरित्या भरुन तो संबंधित कागदपत्रांसह 'जॉइंट कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, ऑफिस ऑफ कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन्स अकाउंट्स, महाराष्ट्र आणि गोवा, बीएसएनएल प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, जुहू रोड, या पत्त्यावर पाठवावा. सांताक्रूझ पश्चिम, मुंबई - 400054 या पत्त्यावर पाठवायचा आहे. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.