मुंबई :  सुकाणू समितीसमोर सरकारनं सपशेल माघार घेतलीय. सरकारनं आता १० हजारांच्या तातडीच्या कर्जाचे निकष बदलले असून यासंदर्भातलं शुद्धीपत्रक संध्याकाळी जाहीर करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता दहा हजारांच्या कर्जाच्या निकषांमधून २० हजारापेक्षा कमी पगार असलेल्या सरकारी कर्मचा-यांनाही हे कर्ज मिळणार आहे. तर १० लाखांच्या आतल्या गाड्या आणि शेतीला पुरक असलेल्या वाहनधारकांनाही ही मदत देण्यात येणार आहे.


 पंचायत समिती सदस्य, सहकारी संस्थांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष वगळून इतर सदस्यांना ही मदत देण्यात येणार आहे. तसंच शेतकरी कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी मंत्रीमंडळाची विशेष बैठक बोलावण्यात येणार आहे. 
 
 दरम्यान, कर्जमाफीचे निकष काय असावेत, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर तोफ डागायला सुरूवात केलीय.