COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई: वसई, विरारमधल्या पावसाचा फटका मीठागरातल्या लोकांना बसलाय. मीठागरांमध्ये पाणी शिरल्यानं चारशे लोक अडकलेयत. प्रशासनाचे अधिकारी अजुनही घटनास्थळी पोहचले नाहीत. या भागात पावसाचा जोर वाढल्यानं रस्ते जलमय झालेयत.


दादरलाही पावसाने झोडपले


दरम्यान,मुसळधार पावसानं दादर परिसराला आजही झोडपून काढलंय. रेल्वे आणि रस्ते वाहतूकीवर याचा मोठा परिणाम झालाय. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी..



ठाण्यातही पावसाची तूफान बॅटींग


मुंबईप्रमाणे ठाण्यातही सकाळपासून सुरु असलेल्या तूफान पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. आज (सोमवार, २ जुलै) सकाळी ठाण्यातल्या गायमूख परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. त्यामुळे ठाण्याहून घोडबंदरकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झालीय. तिकडे ठाणे, कळवा परिसरातल्या मुसळधार पावसानं रुळावर पाणी आलंय. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, बदलापूर परिसरातला आज सकाळपासून तूफान पावसानं झोडपून काढलंय. मध्यरेल्वेची लोकल वाहतूक २० ते २५ मिनिटं उशिरानं सुरू आहे.