गणेश कवाडे, झी मीडिया, मुंबई : जोगेश्वरी आणि नववर्ष शोभायात्रा याचं नातं काही वेगळच आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपनगरातील मराठी भाषिक असा समजला जाणारा हा परिसर गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपलं मराठीपण दाखवून देत असतो. येथील शोभायात्रा ही संपूर्ण उपनगरात प्रसिद्ध आहे. यात विविध कला पथकांचे सांस्कृतिक कार्यक्रम हे प्रमुख आकर्षण असते. पारंपरिक वेषभूषा, भगवे फेटे परिधान केलेले स्त्री- पुरूष सहभागी होतात.


जोगेश्वरीत गुडीपाडव्याला शोभा यात्रेसाठी जोगेश्वरीकर सज्ज झाले आहेत. या गुडीपाडव्याला शोभायात्रेसोबत विविध कार्यक्रम आणि पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. नववर्ष स्वागत सेवा संघ जोगेश्वरी अंतर्गत जोगेश्वरी भटकंती कट्टा आणि नादगर्जना ढोल ताशा पथक यांनी भव्य स्वागत यात्रेचे आयोजन केले आहे.



यंदाच्या शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपारिक वेशभूषेतील महिला, पालखी, वारकरी संप्रदाय, नाद गर्जना ढोल ताशा पथक, लेझीम पथक, ध्वज पथक तसेच जोगेश्वरी भटकंती कट्टा ऐतिहासिक चित्ररथ, सध्याच्या सामाजिक व्यवस्थेवर आधारीत बोलके फलक, मल्लखांब यांसारख्या शारीरिक खेळांचे दर्शन आणि मर्दानी खेळ पहायला मिळणार आहे.


नववर्ष स्वागत शोभायात्रा पालखी मिरवणूक ही शिवटेकड़ी पंत समर्थ विद्यालय येथून प्रारंभ होऊन आनंदनगर, समर्थ नगर, महाराज भवन, गांधी नगर येथून जोगेश्वरी गुफेजवळ मिरवणूकीची सांगता होईल. या स्वागत यात्रेला जोगेश्वरीतील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.