मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silve Oak) या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) आंदोलन केलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना अटक केली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असून गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मिळणार की त्यांचा कोठडीतला मुक्काम वाढणार, हे थोड्याच वेळात कळणार आहे. 


दरम्यान, त्यांच्या जामिनावरच्या सुनावणी दरम्यान अनेक खळबळजनक दावे सरकारी वकिलांनी केलेत.  सदावर्तेंनी हल्ल्याच्या दिवशी नागपूरमध्ये दोन फोन केले, असा दावा सरकारी वकिल अॅड प्रदीप घरत यांनी केला.


सदावर्ते यांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी करत अॅड प्रदीप घरत यांनी सदावर्ते यांच्या चौकशीत आणखी ४ जण या घटनेत गुंतलेले आहेत अशी माहिती कोर्टात दिली.


सदावर्ते चौकशीला पूर्णपण सहकार्य करत नाहीत, तसंच चंद्रकांत सूर्यवंशी याचं नाव चौकशीत समोर आल्याचं अॅड प्रदीप घरत यांनी सांगितलं. सदावर्ते यांनी मीडियाला आपल्या योजनेची माहिती दिली होती. त्याच दिवशी सदावर्ते यांनी सकाळी नागपूरला एक कॉल केला होता. कोनाला फोन केला हे शोधून काढायचं आहे असं सरकारी वकिलांनी सांगितलं.


धक्कादायक म्हणजे या हल्ल्याआधी एक बैठक झाली होती. या बैठकीत सिल्व्हर ओकवर हल्ला करण्याचं ठरलं होतं. अभिषेक पाटील नावाचा एक एसटी कर्मचारी सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने फोन करुन काही पत्रकारांना बोलावलं, याप्रकरणी चार जणांचा ताबा पाहिजे असं अॅड प्रदीप घरत यांनी सांगितलं.


बाहेरून कोण पाठींबा देत आहेत का याबाबत अधिक चौकशी करायची आहे, सदावर्ते यांच्या मोबाईलवरून 31 मार्चला बोलणं झालं, मात्र त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, ते सिमकार्ड त्यांनी नष्ट केलं, ज्या दिवशी घटना घडली त्यादिवशी 11.35 वाजता सदावर्ते यांनी नागपूरला whtsapp कॉल केला, त्यानतंर परत 1.30  त्यांनी नागपुराला पुन्हा कॉल झाला, आणि पत्रकार पाठवा असे ते कॅलमध्ये म्हणाले अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


गेले सहा महिने संप सुरु असून यासाठी पैसे कुठन येतायत याचा तपास करायचा आहे असं अॅड प्रदीप घरत यांनी कोर्टात सांगितलं.