मुंबई : एसटी आंदोलनाच्या निमित्ताने वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या मुलीचा छंद चर्चेत आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांची एक लहान मुलगी आहे.ती आंदोलनाच्या वेळी देखील दिसून आली होती. अर्थात सर्वच लहान मुलांना वाटतं तसंच झेनलाही वाटतं, पाळीव प्राण्यांबद्दल इतर लहान मुलांप्रमाणे तिला देखील आकर्षण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झेन आपल्या मुळगावी नांदेडला जाते, तेव्हा नांदेडमधील मालेगावमध्ये तिला प्राण्यांसोबत खेळायला आवडतं. तिने तिचा हा छंद तिच्या आईने आणि गुणरत्न सदावर्ते यांनी फेसबूकवर शेअर केला आहे.


झेनने गाढव पाळलं आहे, यात झेनने गाढव पाळलं आहे, हे आश्चर्य व्यक्त करण्यासारखंच आहे. कारण गाढव पाळताना कुणी दिसत नाही. पण झेनने गाढव पाळलं, हे देखील एक विशेष आहे, जे सर्वांना जमणार नाही.


तुम्हाला असं वाटेल, झेनला फक्त गाढवंच पाळायचं आहे, किंवा गाढव हाच प्राणी तिला आवडतो, तर असं नाही, तर झेनच्या एका फोटोत तिने वासरालाही मिठी मारली आहे. अर्थातच झेनसाठी सर्वच प्राणी समान असावेत. झेन एका फोटोत गाईला लळा लावताना दिसून आली आहे. 


झेनचा गाढवासोबत एक फोटो आहे, त्याचं नाव मॅक्स आहे, आणि तिने व्हीडिओत बोलताना सांगितलंय, हो गाढव आहे आणि त्याचं नाव मॅक्स आहे. खरंतर गाढव पाळण्याची हिंमत दाखवणे ही मोठी गोष्ट आहे, यासाठी झेन ही कौतुकास पात्र आहे. झेनने यापूर्वी मुंबईत आगीत अडकलेल्या लोकांनी काय काळजी घ्यावी आणि बाहेर यावं , याच्या टीप्स दिल्या होत्या, त्यावर तिला पुरस्कार देवून गौरवण्यात आलं आहे. सोशल मीडियावर झेनने गाढव पाळल्याची जोरदार चर्चा आहे.