मुंबई : हात प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तीला अधिक काळजी घेण्याची गरज असते. पण आम्ही तुम्हाला सांगितलं की, हात प्रत्यारोपण झालेल्या एका तरूणीने चक्क सचिन तेंडुलकरप्रमाणे हातात क्रिकेटची बॅट घेऊन फटकेबाजी केली आहे तर...तुम्हालाही या गोष्टींचं आश्चर्य वाटेल. पण महाराष्ट्रात पहिल्यांदाच हात प्रत्यारोपण झालेल्या मोनिका मोरे हिने वांद्रेच्या रस्त्यावर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे अपघातानंतर दोन्ही हात गमविलेल्या मोनिका मोरे  हिच्या दोन्ही हाताचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र  या शस्त्रक्रियेनंतर काही महिन्यात हातांची नियमित हालचाल होण्यास सुरुवात करण्यास सुरुवात केली आहे. काल चक्क तिने हातात बॅट घेऊन बॅटिंग केली.


2014 साली रेल्वे अपघातात मोनिका मोरे या तरुणीने दोन्ही हात गमावले होते. या तरुणीवर हाताचे प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया 28 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आली. यासाठी मोनिकाला 32 वर्षीय एका ब्रेनडेड व्यक्तीकडून तिला हे हात मिळाले असून चेन्नईहून ते मुंबईत आणण्यात आले होते .


मोनिका महाराष्ट्रातील हाताचे प्रत्यारोपण  करणारी पहिली मुलगी असून तिची शस्त्रक्रिया मुंबईतील एका खाजगी रूग्णालयातील डॉक्टरांनी केली आहे. त्यानंतर अशा आणखी 5-6 व्यक्तीवर हाताच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.


मुंबई पोलिसांनी आयोजित केलेल्या संडे स्ट्रीट या उपक्रमाअंतर्गत वांद्र्याच्या रस्त्यावर क्रिकेट खेळले. 2014 मध्ये घाटकोपरमध्ये झालेल्या अपघातात मोनिका मोरेने आपले दोन्ही हात गमावले होते. त्यानंतर तिच्यावर हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.