मुंबई : Harbor local News : हार्बर लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. हार्बर लोकलचा विस्तार करण्यात येणार आहे. आतापर्यंत हार्बर लोकल अंधेरी आणि गोरेगावपर्यंत धावत होती. आता थेट बोरिवलीपर्यंत धावणार आहे. (Harbor local extension soon, now running to Borivali)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबई आणि मुंबईला जोडणाऱ्या जुन्या रेल्वे मार्गाचा लवकरच विस्तार करण्यात येणार आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर सीएसएमटी ते गोरेगाव किंवा पनवेल ते गोरेगाव दरम्यान रेल्वे धावत आहे. आता या प्रकल्पाचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्याचा विचार आहे.नवी मुंबईला पश्चिम रेल्वेशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. आता त्याचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्याचे काम वर्षभरात सुरू होणार आहे.


2025पर्यंत हार्बर रेल्वे मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार होणार आहे. त्यामुळे हार्बरवरुन थेट पश्चिम रेल्वेवर प्रवास करता येणार आहे. 7 किलोमीटरच्या विस्तारासाठी 745 कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन या सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. आता त्याचा बोरिवलीपर्यंत विस्तार करताना मालाडभोवती सुमारे ३ किमीचा कॉरिडॉर एलिव्हेटेड करण्यात येणार आहे. काही ठिकाणी रेल्वेची जागा उपलब्ध नसल्याने उन्नत मार्ग करण्यात येणार आहे. 



गोरेगावपर्यंत धावणाऱ्या हार्बर रेल्वे मार्गाचा विस्तार करण्यात येणार असल्याने विस्तारीकरणामुळे बोरिवलीपर्यंत हार्बर लोकल धावणार आहे. त्यामुळे बोरीवलीपर्यंत आता गाड्या बदल्याचा त्रास वाचणार आहे. कुर्ला, दादर किंवा वडाळा अशी कसरत प्रवाशांना आता करावी लागणार नाही. सध्या मुंबईच्या उपनगरीय मार्गावर अंधेरी ते दहिसर या मार्गावर सर्वाधिक गर्दी वाढत आहे. अशा स्थितीत बोरिवली ते सीएसएमटी किंवा पनवेल असा हार्बर मार्ग वाढवला तर दादर, वडाळा या स्थानकांवरचा भार कमी होईल. दादरहून मध्य रेल्वेकडे जाणारी रेल्वे बदलून लाखो प्रवासी सीएसएमटीला जात असतात.