मुंबई : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. गाड्या २५ ते ३० मिनिटांने उशिरा धावत आहेत. त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या नोकदारांचे सकाळी प्रचंड हाल होत आहेत.


वाशी ते मानखुर्द प्रवास कासव गतीने


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सानपाड्यातून ६.४ची सुटलेली लोकल मानखुर्द येथे थांबविण्यात आलेली होती. तसेच त्यामागून सुटलेली ६.८ ची लोकलही वाशी खाडी दरम्यान थांबविण्यात आलेली होती. वाशीनंतर एकामागोमाग गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.  वाशी ते मानखुर्दच्या प्रवासासाठी ४० ते ४५ मिनिटे लागत आहेत. त्यामुळे नोकरदार वर्गाला याचा फटका बसला आहे. तर वाशी ते गोवंडी दरम्यानच्या प्रवासासाठी १ तास लागत होता. त्यामुळे महाविद्यालयात आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.


दुसऱ्या दिवशीही सेवा विस्कळीत


दरम्यान, काल चेंबूर येथे रुळाला तडा गेल्याने सकाळी वाहतूक विस्कळीत झाली होती. आज सलग दुसऱ्या दिवशी हार्बर रेल्वेची वाहतूक उशिराने धावत असल्याने प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. 


मानखुर्दजवळ लोकल अर्ध्या तास 


मानखुर्द स्थानकाजवळ लोकल अर्ध्या तास थांबल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला. रेल्वेकडून उद्घोषणा करण्यात येत होती. गाड्या १५ ते २० मिनिटांने उशिराने धावत आहेत. याबद्दल प्रवशांची दिलगिरी रेल्वेकडून व्यक्त करण्यात येत होती. मात्र, गाड्या का उशिराने धावत होत्या, त्याची माहिती रेल्वेकडून देण्यात येत नव्हती.