Dadar Shivneri Bus Pune to Mumbai : दादर हे शिवनेरी आणि दादर रेल्वे स्टेशनवरून लाखो प्रवाशी प्रवास करतात. दादरच्या ब्रीजखालील शिवसेनेरी एसटी महामंडळाचे स्टॅण्ड मुंबईकरांसाठी खूप सोयीस्कर आहे. खासकरून पुण्याला जाण्यासाठी हे बेस्ट ऑपशन आहे. दादरमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून खास ब्रीजखाली हे स्टॅण्ड उभारण्यात आलंय. पण अचानक मुंबई महापालिकेने एसटी महामंडळाला हे मुंबई-पुणे एसटी स्टॅण्ड बंद करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आलीय. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलंय. त्यानंतर उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेची खडे बोल सुनावले आहेत. (HC angry over Dadar Mumbai Pune ST stand Will Girgaoners be sent to Vashi to catch Pune ST)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालिकेने वाशीमध्ये या स्टॅण्डसाठी जागा देण्यात आली आहे, असं सांगितलंय. यावर उच्च न्यायालयाने पालिकेला सुनावले आहेत. पालिकेने मुंबई-पुणे स्टॅण्डसाठी तेथे जवळपास पर्यायी जागा द्यायला हवी. शिवाय गिरगावकरांनी काय वाशीमधील स्टॅण्ड जाऊन एसटी पकडायला पाठवणार का?, असं खडसावलेत. 


न्या. के.आर. श्रीराम आणि न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. प्रशासनाने ते सामोपचाराने सोडवायला हवेत. दादर ब्रीजखालील स्टॅण्ड बंद करायचा असेल तर या मुद्दय़ावर राज्य शासन आणि पालिकेने एकत्र बसून तोडगा काढावा, असे आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केलीय. 


ब्रीजखालील पार्किंग धोकादायक असल्याने ती काढून टाकावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आलीय. त्याची दखल घेत न्यायालयाने मुंबईतील सर्व ब्रीजखालील पार्किंग बंद करण्याचे आदेश दिलेत. मात्र आम्ही दादरच्या ब्रीजखाली पार्किंग करत नाही. अगदी थोड्या वेळ्यासाठी महामंडळाच्या बसेस तेथे उभ्या असतात, असा दावा याचिकेत एसटी महामंडळाकडून करण्यात आलाय.


काय आहे प्रकरण? 


एसटी महामंडळाने अॅड. अर्पणा कलाथील यांच्यामार्फत ही याचिका केलीय. दादर मुंबईच्या मध्यभागी आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेची स्थानके दादरला आहेत. त्यामुळे दादरमधून मुंबई-पुणे बस सेवा सुरू केली आहे. येथे उड्डाणपुलाचे बांधकाम झाल्यानंतर त्याखालील जागा या स्टॅण्डसाठी देण्यात आली आहे. ब्रीजखालील पार्किंग काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महामंडळाने दादर पुलाखालील स्टॅण्ड बंद करावा, अशी नोटीस पालिकेने दिली आहे. ही नोटीस रद्द करावी, अशी मागणी याचिकेत केलीय.