COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई: लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रच होणार असल्याचं भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवलंय. त्यामुळे पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. 


पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दोन्ही निवडणुका एकत्रच होणार असल्याचंही त्यांनी सांगितंलय. भाजपनं त्या दृष्टीनंच तयारी सुरू केल्याचंही त्यांनी सांगितंलय. त्यामुळे आपल्या पक्षाच्या नेत्यांना त्यांनी कामाला लागण्याचा सूचना केल्या आहेत. 


पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा करण्यात आली.