मुंबई : तबलीगी धर्मगुरु आणि महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यात झालेल्या बैठकीचा फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीचा फोटो व्हायरल झाल्याने ही बैठक वादात आली आहे. कारण या बैठकीत असलेल्या कोणत्याच सदस्यांनी मास्क लावला नव्हता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजपने यावर प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे मंत्रालयात देखील मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे गेल्या अनेक दिवसांपासून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. प्रत्येक अपडेट ते लोकांपर्यंत पोहोचवत आहे. पण अशा वेळी त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची देखील गरज आहे.



फोटोवर वाद सुरु होताच आरोग्य मंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं की, या सर्व सदस्यांनी मास्क घातले होते. पण बैठकी सुरु झाल्यानंतर चर्चेदरम्यान त्यांनी मास्क काढून घेतले होते.


निजामुद्दीन मरकजमध्ये सहभागी झालेले तबलीगी समाजाच्या अनेक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व लोकं देशभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये पसरल्यामुळे सरकारच्या चिंता वाढल्या आहेत. यापैकी बऱ्याच जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. 


आरोग्यमंत्र्यांनी लोकांना स्वत:हून समोर येऊन टेस्ट करण्याचं आवाहन करावं म्हणून या धर्मगुरुंची बैठक घेतली. पण या बैठकीचा फोटो आता वादाचा विषय बनला आहे.