Epidemic Diseases : मुंबईत साथीच्या आजाराने डोकं वर काढलं आहे. फक्त 16 दिवसात मुंबईत (Mumbai) साथीच्या आजाराचे जवळपास दीड हजारांहून अधिक रुग्ण (Patient) आढळले आहेत. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा झपाट्याने फैलाव होत असून यात गॅस्ट्रो (Gastro), मलेरिया (Malaria) आणि डेंग्युचे (Dengue) सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबई मनपा दिलेल्या आकडेवारीनुसार 1 ते 16 जुलैपर्यंत मलेरियाचे 355, डेंग्यूचे 264 तर लेप्टोचे 104 रुण आढळले आहेत. तर गॅस्ट्रोचं 932 रुग्णांमध्ये निदान झाले आहे. 23 जून रोजी नायर रुग्णालयात 38 वर्षीय महिलेचा लेप्टोची लागण होऊन मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईला साथीच्या आजाराने विळखा घातला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलेरिया, डेंग्यू, लेप्टो स्वाईन फ्लू हे साथीचे आजार पावसाळ्यात डोके वर काढतात. यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाली असली तरी पावसाळी साथीच्या आजारांचा फैलाव झपाट्याने होत आहे. ही वाढ कायम असून गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू, रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितलं आहे. 


1 ते 16 जुलैपर्यंत रुग्णांचं निदान
मलेरिया - 355
डेंग्यू - 264
गॅस्ट्रो - 932
लेप्टो - 104
कावीळ - 76
स्वाईन फ्लू - 52
चिकनगुनीया - 10


साथीच्या आजाराचा विळखा
मुंबईत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचं प्रमाण सर्वाधिक आहे. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे होणारी अस्वच्छता आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्याने पोटाचे विकार झपाट्याने वाढत आहेत. यांमध्येही बालरुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असून उलट्या, जुलाब आणि अपचन या तक्रारी रुग्णांकडून केल्या जात आहेत. गेल्या दोन आठवड्यात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचं डॉक्टर्स सांगतात.


हे टाळा
- विनाकारण पावसात भिजू नका
- सार्वजनिक ठिकाणी आरोग्याची काळजी घ्या
- उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नका
- पोटाच्या विकारांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ला घ्या


हे करा
- साफ-सफाई असणाऱ्या ठिकाणींच जेवण करा
- स्वच्छ पाणी प्या. तसंच, पाणी उकळून पिण्याचा प्रयत्न करा. 
- स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा. भाज्या तयार करताना स्वच्छ करून त्यानंतरच शिजवा. 
- शिळे पदार्थ खाणं  टाळा. 


वाढलेल्या साथीचे आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिका आरोग्य विभागाने विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. बांधकाम ठिकाणांची नियमित तपासणी, तिथे काम करणाऱ्यांची रॅपिड किट्द्वारे वेळोवेळी तपासणी, पालिकेच्या दवाखान्यांत डेंगीची तपासणी करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.