मुंबई : Mumbai Rain and Mumbai  Local News : मुंबईसह उपनगरात रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत सकाळपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या सुरळीत आहे. तर दादर,परळ,सायन, कुर्ला भागात पाऊस सुरुच आहे. प्रचंड पावसामुळे पहाटे सखल भागांमध्ये पाणीच पाणी साचले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतत पडत असलेल्या पावसामुळे अंधेरी सब वेमध्ये पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुंबईत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तसेच मुंबईत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरुच असल्याने पाणी साचण्याचीही शक्यता आहे.


मुंबईत सध्या रिमझिम पाऊस सुरु आहे. दादर, परळ, सायन, कुर्ला भागात पाऊस सुरुय. मध्य आणि हार्बर रेल्वे पाच ते दहा मिनिटं उशिरानं सुरु आहेत. पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या सुरळीत आहे. पण नेहमीपेक्षा रस्त्यांवर गर्दी कमीच दिसतेय. रात्रभराच्या पावसामुळे मुंबईकरांनी घराबाहरे पडणंच टाळलेलं दिसत आहे. 


मुंबईच्या मलबार हिल परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं दिसून आलं. वाहनचालकांना त्यातूनच मार्ग काढावा लागतोय. मुंबईच्या मरोळ परिसरात पावसाची संततधार सुरुय. याठिकाणीही पावसाचं पाणी साचल्याचं दिसून येतंय. कुर्ल्यात प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे पहाटे सखल भागांमध्ये पाणीच पाणी साचलं. रस्त्यांवरही पाणी साचलंय. त्यामुळे नागरिकांना सावधगिरीनं रस्त्यावरून जावं लागतंय. वाहनचालकांनाही संथगतीनं वाहनं पुढे न्यावी लागताय. 


 नवी मुंबई मध्ये पहाटे पासून पावसाने हजेरी लावली असून  पावसाच्या   हलक्या तसेच अधून मधून जोरदार सरी बरसत आहेत,  नवी मुंबई मध्ये  गेल्या 24 तासात  70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली  आहे.