मुंबई :  येत्या ४८ तासांत मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  दरम्यान, गेले तीन दिवस पडणाऱ्या पावसाने मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा महापालिकेचा तलाव भरला आहे. त्यामुळे मुंबईचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झालेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय हवामान खात्याने याबाबत ही माहिती दिली आहे. मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगला असेल असेही हवामान खात्याने म्हटले आहे.  मुंबईतल्या महत्त्वाच्या काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये मध्यम आणि हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. दरम्यान उद्यापासून म्हणजेच ३० जूनच्या सकाळपासूनच वातावरण ढगाळ राहील. पावसाला सकाळपासूनच सुरुवात होईल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. 


पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने सातारा, कोल्हापूरमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकणात पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे.  तर नाशिक, हिंगोली, नागपुरात चांगला पाऊस असेल असे  हवामान खात्याने म्हटले आहे.