मुंबई : मुंबईतील पवई तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. मुंबईत सोमवारपासून पावसाने जोर धरलाय. मुुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक सखोल भागात पाणी देखील साचलं होतं. दुसरीकडे पवई तलाव देखील भरुन वाहू लागला आहे. या तलावातील पाणी पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक बाबींसाठी या तलावाचे पाणी वापरले जाते. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी हा एक महत्त्वाचा तलाव आहे. (Mumbai Powai Lake overflow)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पवई तलाव आज संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी भरुन वाहू लागला. या तलावाची पाण्याची क्षमता 545 कोटी लीटर एवढी आहे. या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने औद्योगिक वापरासाठी त्याचा वापर केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागलाय.
 
मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे 27 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम 1890 मध्ये पूर्ण झाले. होते 


या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे 40 लाख रुपये खर्च झाले होते. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.61 किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 2.23 चौरस किलोमीटर एवढे असते.


पवई तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये 545.5 कोटी लीटर पाणी असते. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.